Maharashtra Subordinate Service Group B (Non-Gazetted) Preliminary Examination 2018 Series A

प्र.१. 'प्रधानमंत्री मातृत्व (मातृ) वंदना' योजनेबाबत खालील विधाने विचारात घ्या :

(a)सदरहू योजना 1 एप्रिल 2016 रोजी केन्द्र शासनाने लागू केली आहे.

(b)या योजनेनुसार शासन गर्भवती आणि स्तनदा मातांना ₹ 8,000 वित्त सहाय्य देते.

(c)गर्भवती महिलांना आणि स्तनदा मातांना रोख रकमेद्वारे त्यांचे आरोग्य सुधारणे हे देखील या योजनेचे उद्दिष्ट आहे.

पर्यायी उत्तरे :

(1)विधाने (a), (b), (c) बरोबर आहेत.

(2)विधाने (b), (c) बरोबर आहेत.

(3)केवळ विधान (a) बरोबर आहे.

(4)केवळ विधान (c) बरोबर आहे.

उत्तर :

प्र.२. 'दि कोएलिशन ईयर्स' (The Coalition Years) या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

(1)प्रणव मुखर्जी

(2)पी. चिदंबरम

(3)डॉ. मनमोहन सिंग

(4)कपिल सिब्बल

उत्तर :

प्र.3. 2018 च्या आय.पी.एल. टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या खेळाडूंच्या लिलावामध्ये जयदेव उनाडकट हा सर्वाधिक बोलीने करारबद्ध झाला. त्याला कोणत्या संघाने करारबद्ध केले ?

(1)राजस्थान रॉयल्स

(2)किंग्ज इलेव्हन पंजाब

(3)चेन्नई सुपर किंग्ज

(4)कोलकाता नाईट रायडर्स

उत्तर :

प्र.४. महाराष्ट्र शासनाचा,यंदाचा डॉ. अशोक केळकर यांच्या नावे दिला जाणारा भाषा अभ्यासक पुरस्कार नुकताच कोणाला देण्यात आला ?

(1)डॉ.रंगनाथ पाठारे

(2)डॉ.मिलिंद जोशी

(3)डॉ.अविनाश बिनीवाले

(4)डॉ.अशोक कामत

उत्तर :

प्र.५. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या विविध पुढाकारांपैकी पुढे दिलेल्या पुढाकारांच्या पर्यायांपैकी चुकीचा पर्याय कोणता आहे ते सांगा ?

(1)प्रसाद - प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांच्या येथे भाविकांना नि:शुल्क अन्न वितरण.

(2)ह्र्दय - भारताच्या वारसा असणाऱ्या शहरांचे जतन आणि नवजीवन घडवणे.

(3)इनक्रेडीबल इंडिया 2.0 - भारतात पर्यटनाचा विकास घडवणे.

(4)पर्यटन स्थानी ई तिकिटांची सुविधा - ताजमहल आणि हुमायूनची कबर येथे सुरुवात.

उत्तर :

प्र.६. कैलास मानसरोवर यात्रा संबंधी पुढीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ?

(a)या यात्रेचे आयोजन परराष्ट्र मंत्रालयाद्वारे केले जाते.

(b)यात्रेचे आयोजन दोन वेगवेगळ्या मार्गांनी होते एक मार्ग लिपुंलेखा खिंड (उत्तरांचल) आणि दुसरा मार्ग नथुला खिंड (सिक्कीम).

(c)या यात्रेसाठी परकीय/परदेशी व्यक्ती पात्र नाहीत.

(d)यात्रेकरुंना या यात्रेसाठी परराष्ट्र मंत्रालय कोणतीही सवलत/आर्थिक सहाय्य देत नाही.

पर्यायी उत्तरे :

(1)(a), (b), (c), (d)

(2)(a), (b), (c)

(3)(b), (c)

(4)(a), (b)

उत्तर :

प्र.७. अग्नी - 5 बॅॅलेस्टिक क्षेपणास्त्राची लक्ष्यवेधाची क्षमता किती आहे ?

(1)5,000 - 5,500 कि.मी.

(2)3,500 कि.मी.

(3)7,500 कि.मी.

(4)10,000 कि.मी.

उत्तर :

प्र.८. '#MeToo' हे सोशल मिडीयावरील अभियान कशाशी संबंधित आहे ?

(1)लैंगिक अत्याचार आणि हल्ले

(2)नैराश्य, आत्महत्या सारखे मानसशास्त्रीय मुद्द्यांविषयी

(3)सोशल मिडीयावरील व्यक्तिगत माहिती सुरक्षेचे मुद्दे

(4)मतदार अभियान

उत्तर :

प्र.९. जोड्या लावा :

गांव/शहरेप्रकल्प

(a)पवनी तालुका(i)नागझिरा व्याघ्र प्रकल्प

(b)चिचपल्ली(ii)गोसीखुर्द

(c)नवेगाव(iii)माझी मेट्रो

(d)नागपूर(iv)बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र

पर्यायी उत्तरे :

(a)(b)(c)(d)

(1)(ii)(iv)(i)(iii)

(2)(ii)(iv)(iii)(i)

(3)(i)(iv)(ii)(iii)

(4)(i)(ii)(iii)(iv)

उत्तर :

प्र.१०. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे _________ हे महत्वाचे कार्य आढळते ?

(a)राज्यातील स्त्रियांच्या सक्षमीकरणाच्या प्रगतीचे मूल्यमापन करणे.

(b)संविधानाच्या अनुच्छेद 38, 39, 39-A आणि 42 मध्ये अंतर्भूत केलेली निर्देशक तत्वे अंमलात आणणे.

(c)राज्य विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिलांच्या निवडणूका घेणे.

(d)वरीलपैकी नाही.

पर्यायी उत्तरे :

(1)फक्त (a)

(2)(a) आणि (b)

(3)(b) आणि (c)

(4)फक्त (d)

उत्तर :

प्र.११. अवनी चतुर्वेदी यांनी एकटीने लढाऊ विमान उडविणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान नुकताच मिळविला. त्यांनी यावेळी कोणते लढाऊ विमान उडविले ?

(1)मिग - 21 बायसन

(2)मिग - 27 बायसन

(3)सुखोई

(4)सु - 57

उत्तर :

प्र.१२. दारिद्र्यरेषेखालील श्रेणीतील ज्येष्ठ नागरिकांना भौतिक साधने आणि सहाय्यक साधने उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र शासनाने कोणती योजना सुरु केली आहे ?

(1)दिन दयाल वयोश्री योजना

(2)राष्ट्रीय वयोश्री योजना

(3)प्रधानमंत्री वयोश्री योजना

(4)अटल वयोश्री योजना

उत्तर :

प्र.१३. 'न्यू वर्ल्ड हेल्थ' या संस्थेच्या अहवालानुसार मुंबई हे जगातील सर्वाधिक श्रीमंत शहराच्या यादीमध्ये पहिल्या 15 मध्ये आहे. मुंबई नंतर कोणत्या शहराचा क्रमांक लागतो ?

(1)शिकागो

(2)टोरांटो

(3)फ्रँँकफर्ट

(4)शांघाय

उत्तर :

प्र.१४. कोणत्या राज्याने गरोदर स्त्रिया आणि नवजात बालकांच्या कल्याणाकरिता राज्यांमध्ये के.सी.आर.कीट योजना सुरु केली आहे ?

(1)तेलंगाणा

(2)केरळ

(3)हरियाणा

(4)आसाम

उत्तर :

प्र.१५. नुकत्याच निधन पावलेल्या मानवाधिकार कार्यकर्त्या अस्मां जहांगिर ह्या कोणत्या देशाच्या नागरिक होत्या ?

(1)भारत

(2)पाकिस्तान

(3)बांग्लादेश

(4)अफगाणिस्तान

उत्तर :

प्र.१६. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार खालील योग्य जोड्या जुळवा :

(a)जिल्हा परिषद अंतर्गत विविध समित्या व रचना(i)कलम - 95

(b)गटविकास अधिकाऱ्याची नेमणूक(ii)कलम - 78

(c)पंचायत समिती सभापती व उप-सभापती यांचे अधिकार व कार्ये(iii)कलम - 97

(d)मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अधिकार व कार्ये(iv)कलम - 76

पर्यायी उत्तरे :

(a)(b)(c)(d)

(1)(iv)(i)(ii)(iii)

(2)(ii)(iii)(iv)(i)

(3)(i)(iv)(iii)(ii)

(4)(iii)(ii)(i)(iv)

उत्तर :

प्र.१७. खालीलपैकी कोणते विषय समवर्ती सूचित समाविष्ट केले आहेत ?

(a)वीज

(b)विवाह आणि घटस्फोट, दत्तक

(c)वजन आणि मापे आणि त्यांच्या मानकांची स्थापना

(d)कामगार संघटना

पर्यायी उत्तरे :

(1)(a)

(2)(a) आणि (c)

(3)(a), (b) आणि (d)

(4)वरील सर्व

उत्तर :

प्र.१८. पुढीलपैकी अयोग्य विधाने शोधा :

(a)मागासवर्गीय राष्ट्रीय आयोग ही वैधानिक संस्था आहे.

(b)हा आयोग गृह खात्या अंतर्गत काम करतो.

(c)ह्या आयोगाला इतर मागासवर्गातील व्यक्तींच्या तक्रारीमध्ये लक्ष देऊन सोडविण्यासाठीचे अधिकार देण्याएवढे सक्षम करण्यात आलेले नाही.

(d)या आयोगाची स्थापना 1990 साली झाली.

पर्यायी उत्तरे :

(1)(a), (b), (c)

(2)(b), (d)

(3)(c), (d)

(4)(b), (c)

उत्तर :

प्र.१९. खालील विधाने विचारात घ्या : (उच्च न्यायालयाच्या संदर्भात)

(a)उच्च न्यायालयात प्रलंबित कामे असतील तर दोन वर्षापेक्षा जास्त नसलेल्या तात्पुरत्या काळासाठी राष्ट्रपतीस उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश नेमण्याचा अधिकार आहे.

(b)जेव्हा मुख्य न्यायाधीशा व्यतिरिक्त उच्च न्यायालयाच्या कायमस्वरूपी न्यायाधीशाच्या तात्पुरत्या अनुपस्थितीमुळे अथवा तो आपल्या पदाची कामे करु शकत नाही तेव्हा राष्ट्रपती उच्च न्यायालयात प्रभारी न्यायाधीश नियुक्त करू शकतो.

(c)अतिरिक्त न्यायाधीश असो अथवा प्रभारी न्यायाधीश असो वयाची 65 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ते पदावर राहू शकत नाही.

वरील विधानांपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहेत ?

(1)(a) फक्त

(2)(c) फक्त

(3)(a) आणि (b)

(4)(a), (b) आणि (c)

उत्तर :

प्र.२०. खालीलपैकी कोणत्या कारणास्तव राज्य भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर [अनुच्छेद 19(1)(a)] वाजवी बंधने घालू शकते ?

(a)न्यायालयाचा अवमान

(b)अल्पसंख्यांकाचे संरक्षण

(c)परदेशांशी मित्रत्वाचे संबंध

(d)भारताचे सार्वभौमत्व व अखंडत्व

(e)सभ्यता अथवा नितीमत्ता

पर्यायी उत्तरे :

(1)(a), (b), (c), (e)

(2)(b), (c), (d)

(3)(a), (c), (d), (e)

(4)वरील सर्व

उत्तर :

प्र.२१. महाराष्ट्र विधिमंडळाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

(1)विधिमंडळामध्ये प्रलंबित असलेले विधेयक सभागृहांची सत्र समाप्ती झाल्याकारणाने रद्द होत नाही.

(2)विधान परिषदेत प्रलंबित असलेले जे विधेयक विधानसभेने मंजूर केलेले नसेल ते विधानसभेचे विसर्जन झाले असता रद्द होत नाही.

(3)जे विधेयक विधानसभेत प्रलंबित असेल किंवा विधानसभेकडून मंजूर होवून विधान परिषदेत प्रलंबित असेल ते विधेयक विधानसभेचे विसर्जन झाले असता रद्द होते.

(4)यापैकी एकही नाही

उत्तर :