Maharashtra Agriculture Service Preliminary Examination 2018 Series A


Total Questions : 100Total Marks : 200

प्र.१. 'मुळावर येणे' या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा :

(1) मुळे खणून काढणे

(2) झाडाच्या खाली सावलीला येणे

(3) नाशास कारणीभूत होणे

(4) मुळे शोधत येणे

उत्तर :

प्र.२. 'मनकवडा' हा शब्द कोणत्या शब्द समूहाबद्दल वापरला जातो ?

(1) मनाने मोठा असलेला

(2) कवडीचुंबक

(3) प्रेमळ माणूस

(4) दुसऱ्याच्या मनातले ओळखणारा

उत्तर :

प्र.३.(a)अ-कारांत विशेषणांचे सामान्यरुप होत नाही

(b)विभक्ती प्रत्यय लागलेल्या नामांच्या आकारांत विशेषणाचे सामान्यरुप याकारांत होते.

पर्यायी उत्तरे :

(1)फक्त (a) बरोबर

(2)फक्त (b) बरोबर

(3)(a), (b) बरोबर

(4)(a), (b) चूक

उत्तर :

प्र.४. योग्य क्रम लावा :

(a)आता, उद्या, इथे, इकडे(i)उभयान्वयी अव्यय

(b)मागे, पुढे, करिता, साठी(ii)क्रियाविशेषण अव्यय

(c)आणि, अथवा, परंतु, म्हणून(iii)केवलप्रयोगी अव्यय

(d)अरेरे, शाब्बास, अबब, ओहो(iv)शब्दयोगी अव्यय

पर्यायी उत्तरे :

(a)(b)(c)(d)

(1)(i)(ii)(iv)(iii)

(2)(ii)(iv)(i)(iii)

(3)(ii)(iv)(iii)(i)

(4)(i)(ii)(iii)(iv)

उत्तर :

प्र.५. पुढील वाक्यांचे एका केवलवाक्यात अचूक रुपांतर करा :

(a)हा श्रीमंताचा पोर आहे.

(b)तो आहे खुळा.

(c)आमची स्थिती तशीच आहे.

पर्यायी उत्तरे :

(1)हा श्रीमंताचा पोर खुळा आहे, म्हणून आमची स्थिती तशीच आहे.

(2)आमची स्थिती ह्या श्रीमंताच्या खुळ्या पोरासारखी आहे.

(3)आमची स्थिती तशीच आहे, कारण श्रीमंताचा पोर खुळा आहे.

(4)श्रीमंताचा पोर खुळा असल्यामुळे आमची स्थिती तशी आहे.

उत्तर :

प्र.६. पुढीलपैकी 'स्वार्थी' वाक्य कोणते ?

(1) मुलांनो, चांगला अभ्यास करा.

(2) पाऊस पडला तर हवेत गारवा आला असता.

(3) मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा.

(4) मुले घरी गेली.

उत्तर :

प्र.७. खालीलपैकी कोणता शब्द 'भाऊ' या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ते लिहा ?

(1) भ्राता

(2) तनुज

(3) सहोदर

(4) बंधू

उत्तर :

प्र.८. योग्य क्रम लावा :

(a)कान फुंकणे(i)याचना करणे

(b)राम नसणे(ii)म्हातारपण

(c)पिकले पान(iii)चुगली करणे

(d)हात पसरणे(iv)अर्थ नसणे

पर्यायी उत्तरे :

(a)(b)(c)(d)

(1)(iv)(i)(ii)(iii)

(2)(iii)(i)(iv)(ii)

(3)(ii)(i)(iv)(iii)

(4)(iii)(iv)(ii)(i)

उत्तर :

प्र.९. 'खेळाडूंनी रांगेत उभे राहावे.' या वाक्याचा प्रयोग ओळखा :

(1) कर्मणी प्रयोग

(2) अकर्मक भावे प्रयोग

(3) सकर्मक भावे प्रयोग

(4) कर्तरी प्रयोग

उत्तर :

प्र.१०. काही क्रियापदांचा उपयोग वाक्यात सकर्मक व अकर्मक असा दोन्ही प्रकारे होतो. अशा क्रीयापदांना ________ म्हणतात.

(1) संयुक्त क्रियापदे

(2) उभयविध क्रियापदे

(3) द्विकर्मक क्रियापदे

(4) प्रयोजक क्रियापदे

उत्तर :

प्र.११. 'आपण सहलीला जाऊ' या वाक्यातील क्रियापदाचा भावार्थ ओळखा :

(1) आज्ञार्थ

(2) विद्यर्थ

(3) संकेतार्थ

(4) भविष्यकाळ

उत्तर :

प्र.१२. विहग, द्विज, अंडज हे शब्द पर्यायी उत्तरांतील कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत ?

(1) हत्ती

(2) वानर

(3) नवरा

(4) पक्षी

उत्तर :

प्र.१३. 'पेन' या इंग्रजीतून मराठीत रूढ झालेल्या शब्दांचे लिंग कोणते ?

(a)पुल्लिंग.

(b)स्त्रीलिंग

(c)नपुंसकलिंग

(d)लिंग निश्चित नाही

पर्यायी उत्तरे :

(1) (a) व (c)

(2) (a) व (b)

(3) (d)

(4) (c)

उत्तर :

प्र.१४. 'आपल्या पोळीवर तूप ओढणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगणारा पर्याय लिहा : ?

(1) एखाद्याने स्वतःसाठी एखादी चांगली गोष्ट संपादन करावी. तिचा दुसऱ्याने फायदा लुटावा.

(2) स्वल्प देणगी किंवा नजराणा देऊन त्याच्या मोबदल्यात दुसऱ्याकडून मोठे कार्य करुन घेणे.

(3) एकमेकांशी न जमणाऱ्या लोकांना एकत्र आणणे.

(4) दुसऱ्याचे नुकसान झाले तरी आपलाच फायदा करुन घेणे.

उत्तर :

प्र.१५. 'आज गाडीत अतोनात गर्दी होती' वाक्य प्रकार ओळखा :

(1) उद्गारार्थी वाक्य

(2) विधानार्थी वाक्य

(3) प्रश्नार्थी वाक्य

(4) नकारार्थी वाक्य

उत्तर :

प्र.१६. Identify the correct interrogative sentence/s.

(a)What were you doing at two O'clock ?

(b)When she got married ?

(c)Why didn't you water the plants ?

Answer Options :

(1) (a) only

(2) (a) व (c)

(3) (b) only

(4) (b) and (c)

उत्तर :

प्र.१७. Choose the option closest in meaning to the word printed in capitals in the following sentence :

He REPUDIATED all offers of friendship.

(1) Welcomed

(2) Tried

(3) Rejected

(4) Accepted

उत्तर :

प्र.१८. Upheaval in the country came as sudden unexpected events for the government.

Select the most appropriate idiomatic expression for the underlined words in the above sentence :

(1) bolt from the blue

(2) bolt upright

(3) have shot one's bolt

(4) make a bolt for

उत्तर :

प्र.१९. Choose the wrongly spelt words.

(a)ANOINT

(b)ANAMOLY

(c)ANONYMOS

Answer Options :

(1) (a) and (b) only

(2) (b) and (c) only

(3) (a) and (c) only

(4) (a), (b) and (c)

उत्तर :

प्र.२०. Choose the sentence/s containing correct use of prepositions.

(a)The river flowed below a bridge.

(b)The repairs of the roof were completely quickly.

(c)The car in the garage had a flat battery.

Answer Options :

(1) (c) only

(2) (b) and (c) only

(3) (b) only

(4) (a), (b) and (c)

उत्तर :

प्र.२१. Match the following :

(a)Deja vu(i)Final blow (the blow which kills)

(b)Coup de grace(ii)To remain doubtful about something

(c)Wet blanket(iii)The feeling of remembering something

(d)Take something with a pinch of salt(iv)A person who prevents others from enjoying themselves

Answer options :

(a)(b)(c)(d)

(1)(i)(iii)(iv)(ii)

(2)(ii)(iv)(iii)(i)

(3)(iii)(i)(ii)(iv)

(4)(iii)(i)(iv)(ii)

उत्तर :

प्र.२२. Choose the best active voice structure for the following sentence :

He was given a merciless thrashing at school.

(1) A merciless thrashing was given to him at school.

(2) At school, he was given a merciless thrashing.

(3) The thrashing he was given at school was merciless.

(4) The teacher gave him a merciless thrashing at school.

उत्तर :

प्र.२३.(a)Never have I seen such a sight.

(b)Never I have seen such a sight.

Identify the grammatically correct sentence.

(1)Only (a) is correct

(2)Only (b) is correct

(3)Both (a) and (b) are correct

(4)Both (a) and (b) are incorrect

उत्तर :

प्र.२४. Fill in the blank with the correct expression.

She makes _________ about her prejudice against them.

(1) no bones

(2) no hands

(3) no fingers

(4) none of the above

उत्तर :

प्र.२५. The nurse said to us, "Please wait outside the room'.

Which of the following indirect narration is correct ?

(a)The nurse told us to wait outside the room.

(b)The nurse requested us to wait outside the room.

(c)The nurse instructed us to wait outside the room.

(d)The nurse urged us to wait outside the room.

Answer Options :

(1) (a) and (b)

(2) (c) and (d)

(3) None of these

(4) All of these

उत्तर :

प्र.२६. Selfish politicians are troublesome for those who do not toe the line.

Select the most appropriate meaning of the underlined phrase in the above sentence :

(1) go against them

(2) join their group

(3) support them

(4) act according to their will

उत्तर :

प्र.२७. Select the most appropriate meaning of the underlined expression.

New banking policy was presented to us as a fait accompli.

(1) best policy

(2) fateful

(3) leaving no option but to accept

(4) decision that can be changed

उत्तर :

प्र.२८. State the meaning of the underlined phrase in the following sentence :

Environmentalists have no axe to grind.

Choose the correct option :

(1) an axe to be ground

(2) to make an axe sharper

(3) to use an axe to grind

(4) have some selfish motive

उत्तर :

प्र.२९. Identify adjectives in the following sentences :

(a)My father bought a large house.

(b)Weird noises disturbed us in the night.

(c)it was the ghastly apparition of an old man.

Answer Options :

(1) large, weird, ghastly, apparition

(2) large, noises, ghastly, apparition

(3) large, weird, ghastly, old

(4) none of the above

उत्तर :

प्र.३०. Point out the correct sentences.

(a)There are two rooms. You can select either of them.

(b)There are four rooms. You can select either of them.

(c)There are two rooms. You can select any of them.

(d)There are four rooms. You can select any of them.

Answer Options :

(1) (a) and (b)

(2) (b) and (c)

(3) (c) and (d)

(4) (a) and (d)

उत्तर :

प्र.३१. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

(a)महाराष्ट्र विधानसभेने एप्रिल 2016 मध्ये सामाजिक बहिष्काराच्या बंदीबाबत विधेयक मंजूर केले.

(b)या विधेयका खालील गुन्ह्यासाठी जास्तीत जास्त 7 वर्षे कारावास अथवा ₹ 5 लाखापर्यंत दंड अथवा दोन्हीही अशा शिक्षेची तरतूद आहे.

(c)भारतात सामाजिक बहिष्काराबाबत विधेयक मंजूर करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे.

पर्यायी उत्तरे :

(1)(a)

(2)(b)

(3)(c)

(4)वरीलपैकी कोणतेही नाही.

उत्तर :

प्र.३२. आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ कोठे आहे ?

(1)दिल्ली

(2)नाशिक

(3)मुंबई

(4)लासलगांव

उत्तर :

प्र.३३. पगारी प्रसूती रजा देणाऱ्या कायद्याबाबत खालील विधाने विचारात घ्या :

(a)प्रसूती कायदा (दुरुस्ती) विधेयक हे संसदेने मार्च 2017 मध्ये मंजूर केले आहे.

(b)महिला कर्मचारी आता 26 आठवड्यांची पगारी रजा मिळण्यास पात्र असतील.

(c)सदरहू कायद्यानुसार 26 आठवड्यांच्या पगारी रजेचा अधिकार केवळ पहिल्या दोन अपत्यासाठीच आहे.

(d)सदरहू कायदा अशा महिलेस देखील 26 आठवड्याची पगारी रजेस मान्यता देतो जिने तीन महिने वयाच्या आतील बाळास दत्तक घेतले आहे.

पर्यायी उत्तरे :

(1)(a), (b), (c)

(2)(b), (c), (d)

(3)(b) आणि (d)

(4)(a), (b), (c), (d)

उत्तर :

प्र.३४. 15 फेब्रुवारी, 2017 रोजी भारताने एकाच प्रक्षेपकाद्वारे 104 उपग्रहांचे प्रक्षेपण करुन जागतिक विक्रम केला आहे. त्यासंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

(1)इस्त्रो ने 104 उपग्रहांचे एकाच अभियानात फेब्रुवारी 2017 मध्ये पी.एस.एल.व्ही.द्वारे प्रक्षेपण केले.

(2)हे पी.एस.एल.व्ही. चे 37 वे उड्डाण होते.

(3)एकूण 104 उपग्रहांपैकी 101 उपग्रहे ही परराष्ट्रांची होती.

(4)एकूण 104 उपग्रहांपैकी 96 उपग्रहे ही केवळ अमेरीकेची होती.

उत्तर :

प्र.३५. एप्रिल 2017 मध्ये भारताच्या विभिन्न उच्च न्यायालयांमध्ये खालील प्रमाणे महिला मुख्य न्यायाधीश होत्या :

(a)जस्टीस रोहिनी(i)कोलकाता

(b)जस्टीस मंजुळा(ii)दिल्ली

(c)जस्टीस इंदिरा बैनर्जी(iii)बॉम्बे

(d)जस्टीस निशिता म्हात्रो(iv)मद्रास

Answer options :

(a)(b)(c)(d)

(1)(iii)(iv)(i)(ii)

(2)(ii)(iii)(iv)(i)

(3)(iv)(ii)(i)(iii)

(4)(iii)(i)(ii)(iv)

उत्तर :

प्र.३६. केंद्र सरकार व घटकराज्य सरकारे यांच्यात __________ सालापासून तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.

(1)1971

(2)1967

(3)1965

(4)1970

उत्तर :

प्र.३७. खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोगाची दोन स्वतंत्र संस्थामध्ये विभागणी करण्यात आली ?

(1)89 वी घटनादुरुस्ती, 2002

(2)89 वी घटनादुरुस्ती, 2003

(3)88 वी घटनादुरुस्ती, 2002

(4)88 वी घटनादुरुस्ती, 2003

उत्तर :

प्र.३८. खालील विधाने विचारात घ्या :

(a)केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात.

(b)केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांना गैरवर्तनाच्या कारणावरून पंतप्रधान बडतर्फ करू शकतात.

(c)केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्षे किंवा 62 वर्षे जे आधी असेल तो निर्धारित केलेला आहे.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त ?

(1)फक्त (a)

(2)(a) आणि (b)

(3)फक्त (c)

(4)(b) आणि (c)

उत्तर :

प्र.३९. खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?

(1)राज्यघटनेने निवडणूक आयुक्त पदासाठी पात्रता निकष (कायदेशीर, शैक्षणिक, प्रशासकीय अथवा न्यायिक) सांगितलेले आहेत.

(2)राज्यघटनेने निवृत्त होणाऱ्या निवडणूक आयुक्तांची शासनाने अन्य पदावर नियुक्ती करण्यावर बंदी घातलेली आहे.

(3)मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर दोन निवडणूक आयुक्त यांना समान अधिकार आहेत.

(4)मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर दोन निवडणूक आयुक्त यांना ज्या पद्धतीने व कारणासाठी सर्वोच्च न्यायालयाला न्यायाधीशाला पदच्च्युत केले जाते त्याच पद्धतीने पदच्च्युत करता येते.

उत्तर :

प्र.४०. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

(a)पंतप्रधानासहित मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या संसदेच्या एकूण सदस्य संख्येचा पंधरा टक्क्यापेक्षा जास्त असणार नाही.

(b)घटनात्मक तरतुदीनुसार पंतप्रधानाची मर्जी असेपर्यंत मंत्री अधिकारपद धारण करतील.

(c)पंतप्रधान पदावर नियुक्त होण्याच्या वेळी ती व्यक्ती संसदेची सदस्य असणे अनिवार्य आहे.

पर्यायी उत्तरे :

(1)(a)

(2)(b)

(3)(c)

(4)वरीलपैकी एकही नाही

उत्तर :

प्र.४१. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुखांनी लिहलेली शतपत्रे खालीलपैकी कोणत्या मासिकातून प्रसिद्ध होत होती ?

(1)प्रभाकर

(2)समता

(3)सुलभ समाचार

(4)बहिष्कृत भारत

उत्तर :

प्र.४२. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापित केलेल्या खालील संस्थांची कालानुक्रमे रचना करा :

(a)निष्काम कर्म मठ

(b)महिला विद्यापीठ

(c)अनाथ बालिकाश्रम

(d)विधवा विवोहोत्तेजक मंडळी

पर्यायी उत्तरे :

(1)(a), (c), (d), (b)

(2)(d), (c), (a), (b)

(3)(c), ((a), (d), (b)

(4)(d), (a), (c), (b)

उत्तर :

प्र.४३. "थॉट्स ऑन पाकिस्तान" हा ग्रंथ कोणी लिहिला ?

(1)सर सय्यद अहमद खान

(2)बॅॅ. महमद अली जीना

(3)मौलाना अब्दुल करीम आझाद

(4)डॉ.बाबासाहेब आंबेडकर

उत्तर :

प्र.४४. 1935 च्या कायद्यातील पुढीलपैकी कोणत्या तरतुदी अमलात आणल्या नाहीत ?

(a)भारतमंडळ रद्द

(b)भारतीय संघराज्य

(c)केंद्रातील द्विदल राज्यपद्धती

(d)प्रांतीय स्वायत्तता

पर्यायी उत्तरे :

(1)(a) फक्त

(2)(b) आणि (c) फक्त

(3)(a), (b) आणि (c) फक्त

(4)(d) फक्त

उत्तर :

प्र.४५. महात्मा जोतिराव फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली ?

(1)8 सप्टेंबर, 1873

(2)10 ऑक्टोबर, 1873

(3)14 सप्टेंबर, 1873

(4)15 ऑगस्ट, 1873

उत्तर :

प्र.४६. सर विल्यम ली वार्नरने "घाणेरडा निग्रो' असे कोणाला म्हंटले ?

(1) कुंजबिहारी बोस

(2) विरेंद्रकुमार घोष

(3) अरविंदो घोष

(4) हेमचंद्र दास

उत्तर :

प्र.४७. 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली ?

(1) महात्मा फुले

(2) गणेश वासुदेव जोशी

(3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर

(4) जगन्नाथ शंकर शेठ

उत्तर :

प्र.४८. 'भारतीय स्त्रियांचे राष्ट्रीय मंडळ' ही संघटना ________ यांनी स्थापन केली.

(1) कनुबेन मेहता

(2) सरलादेवी चौधुराणी

(3) मेहरीबाई टाटा

(4) तापीबाई हर्डीकर

उत्तर :

प्र.४९. मुंबई येथे 1890 मध्ये गिरणी कामगार संघटना कोणी स्थापन केली ?

(1) भाऊ दाजी लाड

(2) महात्मा फुले

(3) नारायण मेघाजी लोखंडे

(4) एस.एम.जोशी

उत्तर :

प्र.५०. 1907 मध्ये पॅरिस येथे असताना ________ व त्यांचे सहकारी हेमचंद्र दास आणि मिरझा अब्बास यांनी एका रशियन क्रांतीकारीकडून बॉम्ब निर्मितीचे नवीनतम तंत्र शिकून घेतले.

(1) पांडूरंग महादेव बापट

(2) विनायक दामोदर सावरकर

(3) आबासाहेब रामचंद्र

(4) भाई परमानंद

उत्तर :

प्र.५१. भारतीय हवामान विभाग (IMD) च्या दीर्घ कालीन आकडेवारीनुसार, जळगांव, सोलापूर, परभणी आणि नागपूर या ठिकाणी सरासरी _________ प्रखर सूर्यप्रकाश असतो.

(1) 7.0 तास प्रति दिन पेक्षा कमी इतका

(2) 7.1 तास ते 8.3 तास प्रति दिन या दरम्यान इतका

(3) सारख्या प्रमाणात या सर्व शहरात

(4) 9.8 तास प्रति दिन पेक्षा जास्त इतका

उत्तर :

प्र.५२. महाराष्ट्राच्या नैसर्गिक सरहद्दींंच्या बाबतीत खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे ?

(1) ईशान्येस- दरकेसा टेकड्या

(2) वायव्येस- सातमाळा, गाळणा आणि अक्राणी टेकड्या

(3) नेॠत्येस- तेरेखोल नदी

(4) आग्नेयेस- गाविळगड टेकड्या

उत्तर :

प्र.५३. महाराष्ट्रामध्ये, वातावरणाचा दाब हा जानेवारी महिन्यात किनारपट्टीवर सम-समान असतो, तर उर्वरित राज्यात दाब प्रवणता ही _____________.

(1) पश्चिम-पूर्व आणि अत्यंत दुर्बल असते.

(2) दक्षिण-उत्तर आणि मध्यम ते उच्च असते.

(3) दक्षिण-उत्तर आणि अत्यंत उच्च असते.

(4) उत्तर-दक्षिण आणि अत्यंत दुर्बल असते.

उत्तर :

प्र.५४. महाराष्ट्रातील हवामान विभाग व त्यांची स्थानिक प्रादेशिक नावे यांच्या जोड्या लावा :

हवामान विभागस्थानिक प्रादेशिक नाव

(a)अतिवृष्टीचा पर्वतीय प्रदेश(i)देश

(b)तापी खोऱ्यातील संक्रमण विभाग(ii)झाडी

(c)पूर्व विदर्भाचा मध्यम व जास्त पावसाचा विभाग(iii)सह्याद्री

(d)कोरड्या हवामानाचा विभाग(iv)खानदेश

पर्यायी उत्तरे :

(a)(b)(c)(d)

(1)(iv)(iii)(ii)(i)

(2)(ii)(i)(iv)(iii)

(3)(iii)(iv)(ii)(i)

(4)(i)(ii)(iii)(iv)

उत्तर :

प्र.५५. खालील कोणती महत्वाची शहरे तापी-पूर्णा खोऱ्यात वसलेली आहेत ?

(a)अमरावती, अकोला, भुसावळ

(b)बुलढाणा, वर्धा, जळगाव

(c)धुळे, जळगाव

(d)भंडारा, अमरावती, धुळे

पर्यायी उत्तरे :

(1)(a) फक्त

(2)(a) आणि (c) फक्त

(3)(a), (b) आणि (d) फक्त

(4)(b), (c) आणि (d) फक्त

उत्तर :

प्र.५६. देशाच्या आर्थिक विकासामध्ये आर्थिक घटकांची भूमिका निर्णायक असते. हे घटक म्हणजे __________.

(a)भांडवली निर्मिती

(b)कृषीचा विक्रीयोग्य वाढावा

(c)मानव संसाधने

(d)विदेशी व्यापाराची स्थिती

पर्यायी उत्तरे :

(1)(a) आणि (b) फक्त

(2)(a) आणि (c) फक्त

(3)(a) आणि (d) फक्त

(4)(a), (b) आणि (d) फक्त

उत्तर :

प्र.५७. भारतात दारिद्य रेषेखालील लोकसंख्येमध्ये जरी घट होत चाललेली असली, तरी उपलब्ध माहितीच्या आधारे (2004-05) ती किती टक्के आहे ?

(1) 28 टक्के

(2) 39 टक्के

(3) 49 टक्के

(4) 55 टक्के

उत्तर :

प्र.५८. स्त्रियांना कृषी क्षेत्रात सक्षम बनविण्यासाठी ग्रामविकास मंत्रालयाने सुरू केलेल्या महिला किसान सशक्तीकरण परियोजना हा __________ योजनेचा भाग आहे.

(1) दीनदयाळ अंत्योदय योजना

(2) दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्या योजना

(3) दीनदयाळ उपाध्याय उन्नत कृषी शिक्षा योजना

(4) दीनदयाळ स्पर्श योजना

उत्तर :

प्र.५९. शेती उद्योगामध्ये ईकॉमर्स म्हणजे काय :

(1) वस्तू आणि सेवांची डिजिटल यंत्रणेमार्फत खरेदी व विक्री करणे

(2) मालाची निर्यात करणे

(3) इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर करणे

(4) वरीलपैकी कोणतेही नाही

उत्तर :

प्र.६०. उरुग्वे परिषदेमध्ये वाटाघाटीसाठी सहभागी झालेल्या सर्व गॅॅट सदस्य देश खालील मुद्यांवर वचनबध्द झाले :

(a)आयात मालावरील जकात करामध्ये कपात करणे

(b)परिमाणवाचक प्रतिबंध काढून टाकणे

(c)आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता स्वतःची अर्थव्यवस्था खुली करणे

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?

(1)(a) आणि (b) फक्त

(2)(b) आणि (c) फक्त

(3)(a) आणि (c) फक्त

(4)(a), (b) आणि (c)

उत्तर :

प्र.६१. भारत राज्य वन अहवालाच्या 2017 नुसार, भारतात जंगलाची सर्वाधिक टक्केवारी असलेले राज्य कोणते ?

(1) मध्यप्रदेश

(2) मिझोरम

(3) लक्षद्वीप

(4) अरुणाचल प्रदेश

उत्तर :

प्र.६२. सन ____________ मध्ये भारतात प्रकृर्षित शेती जिल्हा कार्यक्रम (IADP) आखण्यात येवून सखोल शेतीचा प्रयोग याद्वारे करण्यात आला.

(1) 1960

(2) 1971

(3) 1963

(4) 1969

उत्तर :

प्र.६३. भारतातून निर्यात होणाऱ्या मालापैकी, खालीलपैकी कोणत्या sector मधून अलीकडील काळामध्ये म्हणजे सन 2011-12 पर्यंत सर्वात जास्त निर्यात होतो (मूल्यांमध्ये) ?

(1) कृषी व सलग्न उत्पादने

(2) औद्योगिक उत्पादने

(3) कच्चे लोखंड व खनिजे

(4) इतर उत्पादने

उत्तर :

प्र.६४. ग्रामीण भागातील असुरक्षित पिण्याच्या पाणी समस्येवर मात करण्यासाठी भारत सरकारने सन __________ मध्ये 'राष्ट्रीय पेय जल पुरवठा' मिशन कार्यान्वित केले.

(1) 1972

(2) 1975

(3) 1978

(4) 1986

उत्तर :

प्र.६५. भारतातील पहिले रोबोट डेअरी प्लांट ___________ ने दूध आणि दुग्धजन्य उत्पादनासाठी सुरु केले.

(1) मदर डेअरी

(2) किसान डेअरी

(3) अमूल डेअरी

(4) आरे डेअरी

उत्तर :

प्र.६६. बचत गटांचा मुख्य उद्देश, खालीलपैकी कोणता आहे ?

(a)अल्प बचतीचा प्रसार करणे

(b)मोठ्या रकमेची कर्जे वितरीत करणे

(c)उत्पादक घटकांची वाटप करणे

(d)अल्प प्रमाणावर कर्जे देणे. (छोट्या रकमेची)

कोणती वाक्य/वाक्ये बरोबर आहे/त ?

(1)(a) फक्त

(2)(b) फक्त

(3)(c) आणि (d) फक्त

(4)(a) आणि (d)

उत्तर :

प्र.६७. मोठ्या उद्योगांची मक्तेदारी आणि प्रतिबंधात्मक व्यापार पद्धती नियंत्रित करण्याच्या दृष्टीने भारत सरकारने 'एकाधिकारीता आणि प्रतिबंधात्मक व्यापार पद्धती' हा कायदा सन ___________ मध्ये अवलंब केला.

(1) 1969

(2) 1991

(3) 1995

(4) 2003

उत्तर :

प्र.६८. माहिती तंत्रज्ञान धोरण अधिनियमीत करणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील पहिले राज्य असून सन ___________ मध्ये महाराष्ट्राने पहिले माहिती तंत्रज्ञान धोरण जारी केले.

(1) 1995

(2) 1998

(3) 2003

(4) 2007

उत्तर :

प्र.६९. आंतरराष्ट्रीय स्तरावर खालीलपैकी कोणती संस्था शेतीपासून शाश्वत स्वरूपाची उत्पादने मिळविण्यासाठी कार्यरत आहे ?

(1) UNO

(2) WHO

(3) IRRI

(4) FAO

उत्तर :

प्र.७०. फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल हे इंटरनेट साधन असून फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल साईट्सला अनेकदा _________ असे म्हणतात.

(1) चॅनेल्स

(2) संग्रह

(3) समूह

(4) कार्यक्षेत्र

उत्तर :

प्र.७१. डॉ.व्ही.एम.दांडेकर व डॉ.निळकंठ रथ ह्या नामांकित अर्थतज्ज्ञांंनी निश्चित केलेल्या दारिद्र्य रेषेच्या सीमेनुसार, एका व्यक्तीस कमीत कमी प्रति दिन किती कॅॅलरी diet मिळाले पाहिजे.

(1) 2250 कॅॅलरीज अन्न

(2) 2650 कॅॅलरीज अन्न

(3) 2850 कॅॅलरीज अन्न

(4) 3000 कॅॅलरीज अन्न

उत्तर :

प्र.७२. खालीलपैकी दुषित होणाऱ्या पाण्यापैकी कोणते, मनुष्य प्राण्यास जास्त हानिकारक आहे ?

(a)रासायनिक खते व कीटकनाशके यांच्या शेतीतील अतिरेकी वापरामुळे

(b)निर्माण होणाऱ्या हानिकारक जीवाणूंचे पाण्यात मिसळले गेल्यामुळे

(c)कारखानदारीने त्यांचे waste By-products नदी पात्रांमध्ये सोडल्यामुळे होणारे दुषित पाणी

(d)वरील सर्व

योग्य पर्याय निवडा :

(1)(a)

(2)(a) आणि (b)

(3)(b) आणि (c)

(4)(d)

उत्तर :

प्र.७३. भारताचे GNP (सकल राष्ट्रीय उत्पन्न) हे खालीलपैकी कोणत्या परिमाणामध्ये मोजले जाते ?

(1) भौतिक परिमाणात

(2) टक्केवारीमध्ये

(3) आर्थिक परिमाणामध्ये

(4) वरीलपैकी सर्व

उत्तर :

प्र.७४. रॅॅचेल कार्लसन यांनी 'मौन वसंत' (Silent Spring) या आपल्या पुस्तकात कीटकनाशकाच्या अंधाधुंद वापराच्या पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम नोंदवले ज्यामुळे देशभरातील कृषी वापरासाठी _________ बंदी घातली गेली.

(1) डीडीटी

(2) एल्ड्रिन

(3) सोडियम मीथेन आर्सोनेट

(4) इथिलीन डायब्रोमाइड

उत्तर :

प्र.७५. कृषोन्नती योजना यामध्ये एक छत्राखाली शासनाच्या खाली दिलेल्या योजनांचा समावेश आहे :

(a)कृषी जनगणना आणि सांख्यिकीवर एकात्मिक योजना

(b)फलोत्पादन समन्वित विकासासाठी मिशन

(c)राज्य भूमी विकास बँकांच्या कर्जरोखेमधील गुंतवणूक

(d)जल सिंचन

(e)तृणधान्ये व भाजीपाल्यासाठी किंमत स्थिरीकरण निधी

पर्यायी उत्तरे :

(1)(a), (b), (c), (d)

(2)(b), (c), (d), (e)

(3)(b), (d), (e)

(4)वरील सर्व

उत्तर :

प्र.७६. पशु आहाराचा विचार करता, उर्जा देणाऱ्या आहारामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो ?

(1) समुद्रातील उप-उत्पादने

(2) बटाटे

(3) पेंड

(4) भात पेंढा

उत्तर :

प्र.७७. म्हशीच्या दुधात सरासरी __________ पाणी आणि _________ स्निग्धांश असते.

(1) 84.2 % व 6.6 %

(2) 84 % व 4 %

(3) 80 % व 6.5 %

(4) 88.4 % व 4 %

उत्तर :

प्र.७८. खालील विधाने पाहावीत आणि त्याप्रमाणे सांगावे :

(a)माशामध्ये स्थित्यंतर होत असते.

(b)चपटे मासे जन्मताना चपटे नसतात.

पर्यायी उत्तरे :

(1)(a) बरोबर, (b) नाही

(2)(b) बरोबर, (a) नाही

(3)दोन्ही बरोबर आहेत

(4)दोन्ही चूक आहेत

उत्तर :

प्र.७९. भारतात सन 2011-12 मध्ये गव्हाचे भात उत्पादनाशी प्रमाण _______ टक्के होते.

(1) 75

(2) 80

(3) 85

(4) 90

उत्तर :

प्र.८०. ज्या भागावर विशेषकरून झाडे आणि लाकूड फाट्याच्या वनस्पती कमी अंतरावर (दाट) घेतली जातात अशा भागाला _________ म्हणतात.

(1) सामाजिक वने

(2) कुरण

(3) वने

(4) यापैकी एकही नाही

उत्तर :

प्र.८१. खालीलपैकी कोणती जात (वाण) मॅॅनडरीन संत्र्याची नाही ?

(1) नागपूर संत्रा

(2) खासी संत्रा

(3) साथगुडी संत्रा

(4) कुर्ग संत्रा

उत्तर :

प्र.८२. अॅग्रोफॉरेस्ट्री कार्यक्रमांचा प्रसार करणारी संस्था _________.

(1) आय.ए.आर.आय

(2) आय.सी.एफ.आर.इ.

(3) एन.डी.ए.

(4) आय.सी.आर.आय.एस.ए.टी.

उत्तर :

प्र.८३. ________ आणि __________ हे जीवनसत्व 'C' चा सर्वाधिक पुरवठा करतात.

(1) पेरु आणि द्राक्षे

(2) पेरु आणि आवळा

(3) आवळा आणि लिची

(4) आवळा आणि संत्रा

उत्तर :

प्र.८४. महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यालगतचा मासेमारीसाठी योग्य क्षेत्र _________ लाख चौ.किमी आहे.

(1) 0.90

(2) 1.12

(3) 1.86

(4) 2.0

उत्तर :

प्र.८५. परिपक्व अंडाशय म्हणजे _________ होय.

(1) फूल

(2) फळ

(3) परागकण

(4) गर

उत्तर :

प्र.८६. कोणते झाड 'टाऊंंग्या' लागवडीसाठी सर्वसाधारणपणे वापरत नाहीत ?

(1) साग

(2) साल

(3) निलगिरी

(4) अशोका

उत्तर :

प्र.८७. सन 2012-13 मध्ये कृषी उत्पादनाचा एकूण उपभोग्य उत्पादनात ________ वाटा होता.

(1) 13.4

(2) 13.6

(3) 13.8

(4) 14.0

उत्तर :

प्र.८८. केळी पिकाचे शास्त्रीय नाव __________ आहे.

(1) पायरस मालुस

(2) कोकोस न्युसिफेरा

(3) पायरस कम्युनिस

(4) मुसा पॅॅरॅॅडिसियाका

उत्तर :

प्र.८९. एकमेकाशी संबंधित असलेल्या प्राण्यातील समागमास खालील कोणती संज्ञा वापरतात ?

(1) हाइब्रिड

(2) बाह्य निपज

(3) बंधीस्त निपज

(4) वंशावळ निपज

उत्तर :

प्र.९०. ___________ या झाडाचा फर्निचर, हिरवळीचे खत आणि जळाऊ लाकडासाठी उपयोग होतो.

(1) सिल्व्हर ओक

(2) मलबेरी

(3) करंज

(4) फणस

उत्तर :

प्र.९१. सन 2011-12 साली, भारताची भात पिकाची उत्पादनक्षमता ________ किलो प्रति हेक्टरी होती.

(1) 2272

(2) 2372

(3) 2472

(4) 2572

उत्तर :

प्र.९२. सन 2004 मध्ये सहकारी बँका आणि संस्थांचा एकूण ग्रामीण पतपुरवठ्यात ________ टक्के वाटा होता.

(1) 9

(2) 10

(3) 11

(4) 12

उत्तर :

प्र.९३. रवंथ करण्याऱ्या प्राण्यांसाठी विपुल प्रमाणात प्रथिने असलेले (जवळपास 40 %) उत्तम प्रतिचे खाद्य :

(1) सरकी पेंड

(2) एरंडी पेंड

(3) जवस पेंड

(4) मोहरी पेंड

उत्तर :

प्र.९४. महिको सिड्स प्रायव्हेट मर्यादित कंपनीने कोबीचा _________ हा वाण विकसित केला आहे.

(1) हरी राणी

(2) ग्रीन ग्लोब

(3) सुमती

(4) सुधा

उत्तर :

प्र.९५. प्राणी प्रजननाच्या कोणत्या पद्धती आहेत ?

(a)इनब्रीडींग

(b)ऑनब्रीडींग

(c)ऑफब्रीडींग

(d)आऊटब्रीडींग

पर्यायी उत्तरे :

(1)(a) फक्त

(2)(a) व (b)

(3)(a) व (c)

(4)(a) व (d)

उत्तर :

प्र.९६. अन्नद्रव्य आणि पाणी यांच्या स्पर्धेमुळे अंबे व मृग बहारामध्ये मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या लहान फळांच्या गळीला काय म्हणतात ?

(1) फळधारण पश्चात गळ

(2) उन्हाळी गळ

(3) हंगामी गळ

(4) काढणी पूर्व गळ

उत्तर :

प्र.९७. सन 2011-12 मध्ये भारतातील गव्हाचे उत्पादन _________ होते.

(1) 87.9 दशलक्ष टन

(2) 90.9 दशलक्ष टन

(3) 93.9 दशलक्ष टन

(4) 96.9 दशलक्ष टन

उत्तर :

प्र.९८. खालील दोन विधाने पाहावीत :

(a)खूप मोठ्या संख्येने बांबू वनांच्या बाहेर वाढतो.

(b)बांबुचा वारा प्रतिरोधक व निवारा पट्टा म्हणून फार परिणामकारक वापर केला जातो.

खालीलपैकी योग्य पर्याय निवडा :

(1)(a) बरोबर, (b) नाही

(2)(b) बरोबर, (a) नाही

(3)दोन्हीही बरोबर

(4)दोन्हीही चूक

उत्तर :

प्र.९९. कृत्रिम रेतन खालीलपैकी कोणाच्या प्रजननामध्ये प्रत्यक्षात केले जात नाही ? जरी ते शक्य असले तरी.

(1) वराह प्रजनन

(2) कुक्कुट प्रजनन

(3) शेळी प्रजनन

(4) मेंढी प्रजनन

उत्तर :

प्र.१००. महाराष्ट्रात रोहयो अंतर्गत फळबाग लागवड वाढीची योजना कोणत्या वर्षी सुरू झाली ?

(1) 1985

(2) 1990

(3) 1995

(4) 2000

उत्तर :